बोदवड महाविद्यालयात “सायबर सिक्युरिटी व ऑन्टीव्हायरस अवेअरनेस” या विषयावर चर्चा

0
बोदवड – येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दि.२४ रोजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या करियर कौन्सेलिंग व प्लेसमेंट सेल तसेच विद्यार्थी विकास कक्ष तर्फे विद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली इलस्ट्रेटेड सोलुशंस,जळगावचे श्री.पंकज पवनीकर व क़्विकहील टेक्नोलोजीज लि.चे असिस्टट सेल्स मनेजर श्री अझरूद्दीन शेख यांनी “सायबर सिक्युरिटी व ऑन्टीव्हायरस अवेअरनेस” या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना चर्चेद्वारा माहिती दिली.
आजच्या डिजिटल युगात भ्रमणध्वनी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने त्याची सिक्युरिटी हि प्राथमिक गरज झालेली आहे.इंटरनेटच्या या युगात सोफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध माध्यमांमार्फत गरज नसतांना सुद्धा स्वयंचलित माहिती संदेश आपल्या दूरध्वनीवर सतत येत असतात,त्यामुळे व्हायरस चा धोका वाढतो व आपण या सायबर युगातील विकासाचे बळी ठरतो.त्यामुळे आपल्या दूरध्वनीची सायबर सिक्युरिटी हि काळाची गरज ठरलेली आहे. म्हणून दूरध्वनी वापरणा-या प्रत्येक माणसाने अन्तीव्हायरस वापरणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.एस.पाटील यांच्याहस्ते व कार्यालय अधीक्षक व्ही.एस.बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्याक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.व्ही.पी.चौधरी व प्रा.नरेंद्र जोशी यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला.तसेच सदर प्रबोधनपर कार्यक्रमासाठी डॉ.ए.आर.बारी,डॉ.सी.टी.शर्मा, डॉ.गीता पाटील यांनी उपस्थिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.