बोदवड भिल्ल समाज बांधवांकडून बंदच्या हाकेला बोदवडकरांना १०० टक्के प्रतिसाद

0

बोदवड – सारंगखेडा ता.शहादा जिल्हा नंदूरबार येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नराधमांना फाशीची शिक्षा होण्याबाबत बोदवड येथील आदिवासी भिल्ल समाज बांधवांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोदवड तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करीत दि.६ शुक्रवार रोजी बोदवड शहर बंदची हाक दिली आहे.या बंदच्या आवाहानाला बोदवडकरांनी १०० टक्के प्रतिसाद देत संपुर्ण बोदवड कडकडीत बंद ठेवण्यात आले.

सारंगखेडा येथील १४ वर्षे आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर व निंदनीय निषेधार्थ आहे. सदर घटनेतील नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात कुणीही असे कृत्य करणार नाही व कुटुंबीयांना शासनाने २५ लाख रुपये मदत घ्यावी व कुटुंबियांना कायदेशीर संरक्षण मिळावे या मागणीसाठी बोदवड तालुक्यातील समस्त आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने बोदवड शहर बंदची हाक देण्यात दिली होती.सदरचे निवेदन माहितीसाठी तहसीलदार हेमंत पाटील,पोलीस निरीक्षक बळीराम हिरे,मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना सादर करण्यात आले होते.

निवेदनावर कालू गायकवाड,रणजीत मोरे,संजू गायकवाड,राजेश मोरे,विनोद मोरे,सुनील सोनवणे,रोहिदास पवार,शक्ती गायकवाड,अरुण गायकवाड,मनोज मोरे,संतोष मोरे,कुणाल गायकवाड,निंबाजी मोरे,उखा मोरे,तोताराम सोनवणे,सागर तोरे यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.