बोदवडला फिरते न्यायालयात ३१ केसचा निपटारा व बावीस हजार रुपये दंडाची वसुली

0

बोदवड – येथे दि.१७ रोजी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मार्फत फिरते लोकन्यायालय (मोबाईल व्हॅन) चे आयोजन करण्यात आले.यावेळी covid -19 बाबत शासकीय नियमाचे पालन करून न्यायदान करण्यात आले.सदर पॅनल मध्ये न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एस. डी.गरड हे पॅनल प्रमुख म्हणून होते.तर बोदवड वकील संघाचे ऍडवोकेट श्री.अर्जुन पाटील ऍडवोकेट श्री.के.एस.इंगळे पॅनल सदस्य म्हणून होते.सदर न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकारांनापैकी एकूण ३१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व त्यामधून रुपये २२,००० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोदवड न्यायालयातील कर्मचारी सहा. अधीक्षक श्री.जे.बी.पाटील,श्री. एस.पी.आठवले, श्री.एस.एस. परसे,बाविस्कर,जाधव,थोरात, सोनवणे,आदींनी प्रयत्न केले.

यावेळी जिल्हाभरातून तसेच  बोदवड तालुका व परिसरातील वकील मंडळी तसेच बोदवड येथील प्रतिष्ठित व्यापारी तसेच मोठ्या प्रमाणावर पक्षकार उपस्थित होते.फिरत्या न्यायालयामार्फत पक्षकारांना त्यांच्या केसचा ताबडतोब निपटारा झाल्यामुळे पक्षकार मंडळीं यांनी आनंद व्यक्त केला तर न्यायालयात यावेळी बोदवड पोलिसांमार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.