बोढरे  शिवारातील  फर्मी सोलर कंपनीची तोडफोड,२५ लाखांचे नुकसान

0

चाळीसगाव प्रतिनिधी –

तालुक्यातील बोढरे शिवारात असलेल्या कन्न्ड घाटाखाली असलेल्या सेालर प्लॉंटवर बोढरे येथील दोघासह इतर ८ जणांनी  सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीतील  सौर ऊर्जाच्या प्लेट तोडून २० ते २५ लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सौर ऊर्जा तयार करण्यासाठी न्यु दिल्ली येथील फर्मी सोलर फार्मस प्रा.लि.कंपनीने तालुक्यातील बोढरे शिवारातील कन्न्ड घाटाखाली प्लॉट टाकला आहे. बोढरे  शिवारातील कंपनीच्या प्लॉटवर ऑफिसच्या मागील बाजुस तारेचे जाळीचे कंपाऊड तोडून बोढरे येथील आरोपी भिमराव बुधा जाधव व सोमनाथ चव्हाण आणि त्यांच्या सोबत २ अनोळखी पुरुष,५ अनोळखी महिला हातात हातोडे ,दगड,कु-हाड व कोयते घेवून आले व आरोपी भिमराव जाधव याने कंपनीचे सिनीयर मॅनेजर विशाल पटटेबहादुर यांना मला पैसे रे नाहीतर तुमच्या कंपनीचे काम बोढरे शिवारात चालू देणार नाही असे सांगून सोबत आलेल्यानी कंपनीच्या सौर ऊर्जा प्लेटा फोडुन  टाका सांगुन त्यांच्यासह कर्मचा-यांना शिवीगाळ केली.सौर ऊर्जा च्या काचेच्या ४४ प्लेट फोडून ावायर कोयत्याने कापून  २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद कपंनीचे मॅनेजर विशाल पटटेबहादूर यांनी दिल्यावरुन वरील १० आरोपी विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपिनिरीक्षक प्रदीप वाल्हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.