बॉलिवूड कलाकारांसह दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

0

मुंबई :  राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे.  राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

राज्य विधानसभेच्या 288 जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.


– रितेश देशमुखचे सहकुटुंब मतदान.


– अभिनेत्री माधुरी दीक्षितने केले मतदान


राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर, खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.
– माजी टेनिस खेळाडू भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ताने केले मतदान.
– अभिनेता आमिर खानने बजावला मतदानाचा हक्क.


– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेसची अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सहपरिवार मतदान केले.


– राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान केले.


– नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क पार पाडला.


– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.


– सरसंघचलाक मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपूर मध्य मतदारसंघात सकाळी सात वाजता त्यांनी मतदान केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.