बुधवारी खग्रास चंद्रग्रहण

0

मुंबई :

येत्या बुधवारी दि. ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे आपणा सर्वास साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १५२ वर्षांपूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी असाच चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमून दर्शनाचा योग आला होता.

सूपरमून म्हणजे काय ?
ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला ‘ सुपरमून ‘ म्हणतात. मात्र ‘ सुपरमून ‘ ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही. रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते.

चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५९ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे.

ब्ल्यूमून दिसणार
एका इंग्रजी महिन्यात ज्यावेळी दोन पौर्णिमा येतात त्यावेळी दुसर्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हणतात. जरी त्याला ब्ल्यू मून म्हटले गेले असले तरी त्यावेळी चंद्र काही ‘ ब्ल्यू ‘ रंगाचा दिसत नाही. यावेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हटलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.