बीएचआर प्रकरणात अकराशे कोटींचा घोटाळा ; एकनाथराव खडसेंचा गौप्यस्फोट

0

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही प्रमुख पुरावे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्‍यात घेतले आहेत. आता या प्रकरणात नेमके कोण अडकते याकडे लक्ष असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदे घेत या प्रकरणाशी संबंधीत महत्वाच्या बाबींचे गौप्यस्फोट केला.

बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याची व्याप्ती ही तब्बल ११०० कोटी रूपयांची असून यात बड्या मंडळीने मातीमोल भावात बँकेच्या मालमत्ता विकत घेतल्या असून यांची नावे पोलीस तपासात समोर येतीलच अशी माहिती आज खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे प्रकरण पध्दतशीरपणे दडपून टाकण्यात आले, अगदी दिल्लीहून चौकशीचे दिलेले निर्देश सुध्दा पाळण्यात आले नसल्याचा गौप्यस्फोट केला.

गिरीश महाजन यांचा या प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही? हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. लेटर पॅड सापडले याचा अर्थ संबंध आहे असा होत नाही, चौकशीतून सगळे समोर येईल असे खडसे यांनी म्हटले आहे.

म्‍हणूनच खडसेंची पत्रपरिषद

सदर प्रकरणात जिल्ह्यातील खासदार, आमदार व माजी मंत्र्यांचा समावेश आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्‍याने काही माहिती दिली तर चौकशीत हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे नावे जाहीर करणे हे योग्य ठरणार नाही म्हणून एकदा का चौकशी पूर्ण झाली की दोन दिवसांत संपूर्ण माहितीसह पत्रकार परिषद घेणार आहे’, असंही खडसे यांनी सांगितले होते. त्‍यानुसार कागदपत्र घेवून सदर पथक पुण्याकडे रवाना झाल्‍याने खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली.

Leave A Reply

Your email address will not be published.