बालसुधारगृहात कोरोनाचा शिरकाव; 14 मुलं बाधित

0

उल्हासनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यासह मुंबई शहरात कोरोनाची लाट कमी होत जात असताना आज उल्हासनगरमधील बालसुधारगृहतात जवळपास १४ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिंतेत थोडी भर पडली आहे.

या १४ मुलांपैकी ४ अपंग मुलांचाही समावेश आहे. महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये संबंधित मुले कोरोना बाधित आढळली आहे. संबंधित सर्व कोरोनाबाधित मुलांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित सर्व मुले 12 ते 17 वयोगटातील असल्याची माहिती बालसुधारगृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यानंतर आता बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.