बार्टी तर्फे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाईन अभिवादन कार्यक्रम

0

फैजपूर प्रतिनिधी: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे [सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था] डाॅ. बाबासाहेब आंबेडकर , संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी मार्फत “राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम” ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.

सदरील कार्यक्रमास; प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री. धम्मज्योती गजभिये (महासंचालक बार्टी पुणे) व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्रीमती भाग्यश्री अर्जून पाईकराव मॅडम (जिल्हा प्रकल्प अधिकारी, समतादूत विभाग जळगाव) हे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री. चंद्रकांत इंगळे सर( शिव-फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील प्रबोधनकार व समतादूत, येवला जि. नाशिक) इंगळे सरांनी छत्रपती शाहू महाराजांचे संपुर्ण जिवन कसे होते व महाराजांनी केलेल्या वैकासिक व वैचारिक कार्याच्या प्रगतीवर प्रकाश टाकत छत्रपती शाहू महाराजांच्या शेतीविषयक, मागासवर्गीयांचे शैक्षणिक धोरण विषयक, आरक्षणाची तरतूदी विषयक, धरण बांधणीबाबतचे कार्य ,सामाजिक सुधारणा ,कायदे,कला आणि कलावंत यांच्यासाठी योगदान यावर प्रकाश टाकला. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेली साथ व त्यामागचा विशाल हेतू चंद्रकांत इंगळे सरांनी छान पद्धतीने विश्लेषण करीत विषयाची मांडणी करून छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर विशेष पैलूवर ,शाहू महाराजांचा सामाजिक क्रांतीचा विचार  मांडले. ऑनलाईन झुम मिटींग च्या माध्यमातून श्रोत्यांना राजश्री शाहू महाराजांबद्दल खुप उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच दर शनिवारी व रविवारी अशा विविध महापुरूषांचे जीवनकार्य व विविध शासकीय योजनांची माहिती अशा विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणार असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा समतादूत बार्टी तर्फे करण्यात आले आहे.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा समतादूत बार्टी मार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री. युनुस शहादूर तडवी (समतादूत, रावेर जि. जळगाव) यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्रीमती. अर्चना संतोष किरोते (समतादूत, जामनेर जि. जळगाव) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा समतादूत यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.