बाम्हणे / हणमंतखेडेसिम रस्ता खड्डेमय झाल्याने नागरीकांचे हाल

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : बाम्हणे / हणमंतखेडेसिम रस्ता खड्डेमय झाल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत सध्या पाऊस होत असल्याने शेत जमिनीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने दुचाकी वाहन धारक पडण्याच्या घटना घडत आहेत. शेतीचे पाणी निघण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला जेसीबी यंत्राने चाऱ्या कोरणे जरुरीचे झाले असून ते काम त्वरीत होणे ही काळाची गरज आहे. निपाणे बाम्हणे, जवखेडसिम,अंतुर्ली करांना माहिजी नांद्रा उत्राण, हणमंतखेडेसिम तसेच माहिजी रेल्वे स्टेशन वर जाण्या-येण्यासाठी सोयीचा आहे. सध्या या रस्त्याची खूप दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे सांगणे कठीण आहे. तरी सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून डांबरीकरण नुतनीकरण करावे डांबरीकरण करणे शक्य नसेल तर किमान खड्डे तरी बुजावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.