पारोळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याच्या जाहीर निषेध

0

पारोळा (प्रतिनिधी) : राज्यसभेत झालेल्या नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीच्या वेळी माननीय खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला म्हणून माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सदर राज्यसभेच्या कामकाजातून जय भवानी जय शिवाजी या जय घोष रेकॉर्ड करून काढून टाकण्यात येईल अशी समज दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे मन दुखावले व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमान केले आहे म्हणून आम्ही पारोळा तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तर्फे ह्या कृतीच्या खेद व्यक्त करीत आहोत असे निवेदन पारोळा तहसीलदार अनिल गवांदे साहेब यांना देण्यात आले.

यावेळीपारोळा तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष पिरण कुमार, अनुष्ठान उपाध्यक्ष संजय पाटील पारोळा तालुका रेशनिंग कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, पारोळा अपंग सेल कमिटीचे अध्यक्ष सुरेश दुबे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शाहिद बेलदार अादी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.