बापरे.. गाढविणीच्या दुधाला हजारोंचा भाव

0

हिंगोली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला प्रतिबंध करायचा असेल तर रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी  त्यामुळे आजही प्रत्येक जण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यातच एक आश्चर्यकारक बातमी समोर आलीय.

हिंगोली शहरामध्ये एक विषय चांगलाच चर्चेत आहे. हे कितपत सत्य आहे कुणाला माहीत नाही मात्र याकडे मोठ्या प्रमाणावर लोकांची ओढ दिसून आली.  गाढविणीचं दूध प्यायलं की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सांगून काही जणं हे दूध विकत आहेत. त्यामुळे कोरोनापासून  बचाव होतो असा दावाही हे करत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की हिंगोलीतगाढविणीचं दूध 10 हजार रुपये लिटरने विकलं जातंय.

कारण हिंगोलीच्या गल्लोगल्लीत जाऊन एक प्रचार सुरू झाला आहे. ‘गाढविणीचं चमत्कारिक दूध एक चमचा प्या आणि सगळ्या आजारांपासून मुक्ती मिळवा. हे दूध प्यायल्याने लहान मुलांना न्यूमोनिया, ताप, खोकला, कफ हे आजार होत नाहीत. त्याचबरोबर या दूधामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि कोरोना होत नाही,’ असा दावा हे दूध विकणारे लोक करत आहेत.

चिकनगुनियावर गुणकारी ठरू शकतात हे घरगुती उपाय, या पद्धतींचा करा अवलंब हे दूध विकणारे बालाजी मेसेवाड म्हणाले, ‘ मी गाढविणीचं ताजं दूध काढून ते विकतो. ते अनेक आजारांवर गुणकारी आहे. एक चमचा दूधाची किंमत 100 रुपये आणि 1 लिटर दुधाची किंमत 10 हजार रुपये आहे. हे दूध त्वचा आणि शरीराला उपयुक्त असून नवजात बालकाला जन्मल्यावर तीन दिवस न चुकता हे दूध पाजलं तर त्याला आयुष्यभर फायदा होतो.’

याबाबत डॉ. व्ही. एन. रोडगे यांनी आपलं मत सांगितलं. ते म्हणाले,’ गाढविणीचं दूध 10 हजार रुपये लिटरने विकलं जात आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे दूध प्यायल्याने कोरोनासारखा आजार बरा होतो हे खोटं आहे.

हे दूध पिण्याऐवजी डॉक्टर सांगतील ते औषध घेतलं पाहिजे. अशा अंधश्रद्धांवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि आपले पैसे वाया घालवू नयेत. आजार झाला तर थेट डॉक्टरांकडे जावं असं आवाहन मी हिंगोलीच्या जनतेला करेन.’  विज्ञान किंवा आधुनिक वैद्यकशास्राच्या कसोटीवर न तपासता काही औषधं सांगितली जातात पण त्यातील तथ्य तपासणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं काम आहे. अंधश्रद्धा आणि अफवांमुळे नुकसान तर होतंच, प्रसंगी जीवही जाऊ शकतो त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास न ठेवणंच हिताचं ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.