बांभोरी येथे माती परीक्षण कार्यशाळा संपन्न

0

जळगाव : प्रतिनिधी 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषीकन्या कु.दर्शना वर्मा यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता या कार्यक्रमा अंतर्गत अभ्यास दौऱ्यात जळगाव जिल्ह्यातील बांभोरी या गावात माती परीक्षण प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले.  यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. सतीश मराठे, त्यांची पत्नी सौ. ज्योती मराठे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणासाठी लागणारे साहित्य, परीक्षांचे फायदे, मातीचे नमुने संकलन करण्याचे तंत्र, मातीत आढळणारे विविध पोषक अन्नद्रव्य घटक व त्यांचे प्रमाण कसे अबाधित ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले. माती परीक्षण कसे आणि का करावे यावर हि सविस्तर माहिती देण्यात आली. याप्रसंगी  उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळाल्याने माती परीक्षणाचे महत्व सर्वांना लक्षात आले. मातीचे नमुने पुढील परीक्षणासाठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय येथील माती व पाणी परीक्षण तपासणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.अनिल फापळे, कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.व्ही. सावळे व विषय तज्ञ प्रा. मोनिका भावसार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.