बजाज फिनसर्व्ह व नाहाटा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु

0

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. औ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दि. ५ रोजी बँकिंग, फायनान्स व इन्शुरन्स या विषयात प्रमाणपत्र कोर्स सुरु करण्यात आला.

या कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्य प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे, कार्यक्रम उदघाटक  राजा डिक्रूज ( वरिष्ठ व्यवस्थापक सी. एस. आर.) प्रमुख अतिथी व प्रशिक्षक डॉ. सुमित्रा चव्हाण महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. व्ही , जि , कोचुरे तसेच कोर्स समन्वयक प्रा. सपना कोल्हे इ. उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख वक्ते राजा डिक्रूज यांनी या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये व महत्व पटवून दिले.

त्यांनी उद्योग व नौकरी साठी आवश्यक कौशल्ये या कोर्से दवारा विद्यार्थ्यांमध्ये विकसित केले जातील या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सुमित्रा चव्हाण यांनी विदयार्थ्यांना संज्ञापन कौशल्याचे महत्व विशद केले व ज्ञान असून चालत नाही ते सादर करता आले पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी विद्यार्थीना आपल्या मार्गदर्शनात नौकरी व व्यवसायात उपलब्ध संधी मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य व समयसूचकता याचे महत्व विदयार्थ्यांना सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ.एन. ई. अंगाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोर्स समन्वयक प्रा. सपना कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. स्मिता बैंडाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.पी. के. पाटील. प्रा. डॉ.ममताबेन पाटील प्रा. डॉ. रश्मी शर्मा, प्रा. के. पी. पाटील, प्रा. भूषण चौधरी, प्रा. प्रियंका वारके, प्रा. खिलेश पाटील, प्रा. वर्षा पाटील, प्रा.स्वाती शेळके, प्रा. जयश्री चौधरी, प्रा. हेमंत सावकारे, बापू वारके यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.