बँकाच्या वेळेत बदलामुळे ग्राहक हैराण

0

जळगाव | प्रतिनिधी

संचारबंदी काळात जळगाव शहरातील बँकाच्या कामकाजाच्या वेळेत मंगळवार पासून बदल करण्यात आला. वेळ सकाळी १० ते २ पर्यंतच बँक सुरु राहणार असल्याचे बोर्ड सर्व बँकेत लावण्यात आले होते. या वेळेतील बदला मुळे अनेक ग्राहकांची कुचंबणा झाली. त्यामुळे दुपारी २ नंतर आलेल्या ग्राहकांना रिकामे हाती परत जावे लागले.
कोरोनामुळे साथीच्या आजाराचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी तसेच या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी पास बुक अपडेट, के.वाय .सी. संबंधित कामे, खाते उडण्याचे काम, खाते विवरणाचे कामे बँकाकडून काही दिवसांसाठी स्थगित केले आहे. तसेच ग्राहकांनी बँकेच्या डिजिटल बँकिंग पर्यायांचा वापर करण्याची विनंती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.