फैजपूर रा.काँ.च्या वतीने प्रांतधिकारींना निवेदन देऊन केला भाजप प्रदेशाध्यक्षांचा निषेध

0

फैजपूर प्रतिनिधी: अन्न नागरी पुरवठा मंत्री मा.छगनजी भुजबळ साहेब यांनी प.बंगालचे निकाला नतंर ममता दिदीनी प्रचंड बहुमत प्राप्त झाल्याने त्यांना सुभेच्छा दिल्या व गौरवाने झाशीच्या राणीची उपमा दिदीना दिली त्याबद्दल भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चद्रकांत पाटील यांना राग अनावर होवून रागाच्या भारात त्यांनी भुजबळ साहेबांना धमकी दिली व भुजबळ तुम्ही जामीनावर आहात यासह अनेक बेताल वत्कव्य करुन दादागिरीच्या भाषेत धमकी दिली.

त्याबद्दल प्रथम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटीलांचा जाहीर निषेध.छगन भुजबळ साहेब हे बारा बलुतेदाराचे सरदार असुन ओबिसीचे नेते आहेत ओबिसी बद्द्ल असलेल प्रेम हे भाजपाच्या प्रदेश अध्यक्ष यांनी आज दाखवुन दिले. त्याआगोदर सीबीआयचे अध्यक्ष यांनी गोपीनाथ मुंढे यांचा संशयापद मृतु बाबतच्या मुद्दे उपस्थित केलेला व्हिडीओ जनतेने पहीला ऐकला आहे. त्याचे काय झाले याचे अजूनही कळले नाही. एकनाथराव खडसे साहेब यांच्यावर किती अन्याय झाला हे सर्वांना महीत आहे पकंजा मुंडे विनोद तावडे यांच्यासह अनेक ओबिसीचे नेत्यांना अलगद बाजुला सारल्याच सर्वांनी अनुभले आहे. भुजबळ साहेबांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही त्यांनी दिल्लीला जे महाराष्ट्र सदन बांधले त्याला सरकारचा एक रुपया न घेतला बांधले आहे बिल्डरला एफएस आय वाढवणीच्या बदल्यात सुंदर भवन बांधले आहे हे सुद्धा जनतेला महीत झाले आहे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवुन विनाकारण त्रास दिला हे सुद्धा आता जनतेच्या लक्षात आले त्यामुळे आशा धमक्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी देवु नये ओबिसीसह सर्व बहुतजन समाजाचे काय्रकर्ते भुजबळसह सर्वांन सोबत उभे राहातील.

ही वेळ धमक्या देण्याची नसुन जगासह देशावर खासकरुन राज्यवर जे कोरोना संकट आले त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्षसह विरोधी पक्ष नेत्यांनी केंद्रात आपले वजन वापरुन जनतेला आक्सीजन व अन्य कोरोना संबंधित औषधाची मदत मिळवुन द्यावी. राज्याच्या जनतेच्या हितासाठी लस मिळवणे साठी विरोधकांनी आपले वजन वापरुन जास्तीत जास्त महाराष्ट्रासाठी मोफत लस उपलब्ध करून जनतेवर उपकार करावें यासह राज्य सरकारच्या कराच्या ज्या रक्कमा केंद्राकडे घेणे बाकी आहे त्या या याकठीन  प्रसंगी जनतेच्या हितासाठी व आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे वजन वापरुन मिळवून देण्यासाठी विनंती करतो.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ साहेबांना धमकी दिली त्यांचा अवमान केला त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध त्यांनी त्वरित जाहीर माफी मागावी तसे न झाल्यास कोरोना काळ संपल्यावर ओबिसीसह बहुजन समाज  चंद्रकांत पाटीलांनसह भाजपाचे आमदार खासदार वरीष्ठ पदाधिकारी यांना गावा गावात ओबिसीसह बहुजन समाजातील जनता जाब विचारुन जेरीस अनतिल व अद्ल घडविल्या शिवाय राहणार याची नोंद त्यांनी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देते वेळी उपस्थित शेख कुर्बान हाजी करीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनवर खाटीक नगरसेवक रशिद तडवी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकीर सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अशोक भालेराव अल्पसंख्याक शहराध्यक्ष साजिद शेख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.