फैजपूर भाजप शहराध्यक्षांचे फेसबुक हॅक

0

फैजपूर :- भाजपा शहराध्यक्ष संजयजी रल यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञात समाजकंटकांनी हॅक करुन त्याचा गैरवापर करत आहे तर यासंबंधीची लेखी तक्रार फैजपूर पोलिस स्टेशन स.पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना देतांना भाजपा शहराध्यक्ष संजयजी रल,मा.उपनगराध्यक्ष राकेश जैन, ज्येष्ठ नेते पि.के.चौधरी,नमो सेना महिला जिल्हाअध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, राष्ट्रीय नमो सेना जिल्हाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी रघुनाथ कुंभार,रोझोदा मा.सरपंच दिपक धांडे, राजेश सोनटक्के,देवेंद्र झोपे सर, रुपम महाजन, सुनील दुसाने इ.उपस्थीत होते.

गेल्या दोन दिवसांपासून फैजपूर परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांचे फेसबुक अकाऊंट अश्याच प्रकारे हॅक करण्यात आले असुन या सर्व प्रकारामागे एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.सोशल मीडिया चा वापर सगळ्यांनी काळजीपूर्वक करावा तसेच सर्व प्रकारची प्रायव्हसी सेटिंग करून आपले अकाऊंट सुरक्षित करावे असे आवाहन स.पो.नि.दत्तात्रय निकम यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.