फनी वादळामुळे तब्बल 9336 कोटींचे नुकसान

0

भुवनेश्वर – फणी चक्रिवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘मे’ महिन्यात धडकले होते. फनी वादळामुळे येथील वारे ताशी २०० किमी इतक्या वेगाने वाहत होता. ओडिशाच्या किनारपट्टीवर फणी वादळ धडकल्यानंतर  64 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.  या वादळामुळे ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले होते. घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली गेला होता. मोठ्या प्रमाणात ओडिशाचे नुकसान झाले. फनी या चक्रीवादळामुळे तब्बल 9336 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळादरम्यान 6643.63 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी जवळपास 2692.63 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. दरम्यान राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई आणि इतर कार्यासाठी तब्बल 9336 कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने हा खर्च पूर्ण करण्यासाठी एनडीआरएफकडे 5227.68 कोटींची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.