वाकडी येथे तरुणाची आत्महत्या

0

जळगाव :- वाकडी येथे आनंदा बाजीराव गायकवाड (वय ३२) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेमुळे गावात खळबळ उडाली.

आनंदा गायकवाड  हे कामावरून रात्री उशिरा घरी आले. यानांतर ते मांगीलाल महाराज मंदिरात झोपण्यास गेले . मात्र सकाळी ६ वाजेच्या सुमारास भगव्या ध्वजाच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी नातलगांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुले,भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.