प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी सरसावले नेहरू युवा केंद्राचे समन्वयक

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणाऱ्या नेहरू युवा केंद्रामार्फत “स्वच्छ भारत-क्लीन इंडिया” अंतर्गत ‘प्लास्टिक मुक्त अभियान’ राबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्राचे जळगाव जिल्हा युवा अधिकारी श्री.नरेंद्र डागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरातील विविध ठिकाणी उघड्यावर पडलेला प्लास्टीक कचरा जमा करून त्याचे निर्मूलन करण्यात आले.

यावेळी नेहरू युवा केंद्र चाळीसगाव तालुका समन्वयक शंकर पगारे, सागर नागणे, नकवाल इंटरप्रायजेसचे राहुल नकवाल, शुभम जाधव तथा न.पा.कर्मचारी विनोद जाधव, अरुण राठोड व कुणाल जाधव यांनी परिश्रम घेतले.

दिनांक १ अक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण ३० गावांमध्ये प्लास्टिक कचरा निर्मूलन केले जाणार तसेच प्लास्टिक मुक्त भारतासाठी जनजागृती केली जाणार आहे असे शंकर पगारे यांनी सांगितले. सर्व नागरिकांनी आपला परिसर, गाव तसेच देश स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.