प्रेम संबंधाच्या संशयावरून युवकांवर ब्लेडने वार ; आरोपीस अटक

0

पारोळा (प्रतिनिधी) : बहिणीशी प्रेम संबंध ठेवल्याचा संशयावरून एका युवकांवर आरोपी ने भर चौकात ब्लेडने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक ४ रोजी सांयकाळ च्या सुमारास घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

या बाबत सुरेश यादव पाटील  रा . तलाव गल्ली यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली की त्यांचा मुलगा नितीन हा दिनांक ४  रोजी शेतातुन  मोटर सायकल क्रमांक एम एच १९ बी  ६६०५ ने घरी येत असताना तलाव गल्ली कॉर्नर वर  शिरोळे  प्रोव्हिजन दुकाना समोर आरोपी अजय रवींद्र चौधरी याने त्याच्या बहिणीशी नितीन याचे प्रेम संबंध असल्याचा संशय ठेऊन धारदार ब्लेडने नितीन याच्या गळ्यावर सपासप वार केल्याने नितीन हा रक्तबंबाळ होऊन मोटरसायकल वरून खाली पडला अचानक झालेल्या घटनेने पुर्ण बाजार पेठेसह तलाव गल्लीत एकच खळबळ उडाली दरम्यान आरोपीने वार केल्या नंतर घटना स्थळावरून पळ काढला या नंतर तलाव गल्लीतील युवकांनी गंभीर जखमी नितीन यास कुटीर रुग्णालयात नेले असता त्यावर प्राथमिक उपचार करून धुळे येथे हलविण्यात आले त्यावर रात्री उशिरा पर्यंत उपचार सुरू होते.

सदर दोघां मध्ये यापूर्वी देखील अनेकदा वाद झाल्याचे नागरिकांनी सांगितले . सदर घटने नंतर पोलिसांनी  अवघ्या एक तासात आरोपी अजय चौधरी यास जुलामपुरा परिसरातुन ताब्यात घेतले दरम्यान न्याय सहसहायक प्रयोग शाळेचे पथक येऊन त्यांनी घटना स्थळावरून जखमी नितीन याच्या रक्ताचे नमुने घेतले यावेळी पो. नि. लीलाधर कानडे,स पो नि निलेश गायकवाड,ए पी आय रवींद्र बागुल उपस्थित होते ,शहरात वाढत्या प्रेम  प्रकरणामुळे रोजच वाद – विवाद होत आहे. असे प्रकार होत आहे. आरोपी अजय चौधरी याच्या विरोधात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन पुढील स्वता पोलिस निरिक्षक लीलाधर कानडे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.