पारोळा शहर विकास आघाडीचा विकास कामात ‘खोडा’ ; नगराध्यक्ष करण पवार

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथील क्रीडा संकुलाचा विषय चांगलाच गाजत असुन आजी-माजी नगराध्यक्षमध्ये चांगलीच जुंपलीये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.आज पुन्हा नगराध्यक्ष करण पवार यांनी शहराच्या विकास कामाना शहर विकास आघाडी विकास कामात विरोध करीत असल्याचा घणाघाती आरोप न.पा.च्या सर्वसाधारण सभेत केला.

दि ४ रोजी नगरपालिकेच्या सर्वसाधारण  सभेत पटलावर असलेल्या एकूण ६६ विषयावर चर्चा होऊन  ६२ विषयांना मंजूरी देण्यात आली तर  ४ महत्वपूर्ण विषयवार शहर विकास आघाडी ने लेखी हरकत घेतली. सदर बैठक ही व्ही सी पद्धतीने घेण्यात आली यात नगराध्यक्ष करण पवार उपनगराध्यक्ष जयश्री बडगुजर मनीष पाटील,कैलास चौधरी, दीपक अनुष्ठान, प्रकाश महाजन, पी जी पाटील,अंजली पाटील, वर्षा पाटील, वैशाली पाटील, भैया चौधरी, मंगेश तांबे,सुनीता प्रकाश वाणी,रेखाबाई चौधरी,छाया दिलीप पाटील व प्रभारी मुख्यधिकारी विकास नवले सहभागी होते. यावेळी एकूण पटलावरील ६६ विकास कामांच्या विषयवार वाचन व चर्चा झाली यात शहरातील अनेक रस्ते भुयारी गटारी ,सह छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात सी सी टी व्ही लावणे,माजी सैनिकांना करात सूट देणे सह काही विषयांना मुदत वाढ विषय होते यावेळी शहर विकास आघाडी चे नगरसेवकांनी ७, १३, ४१, ४९ या विषयावर विरोध केला, वंदना शिरोळे, अशोक चौधरी, रोहन  मोरे ,महेश चौधरी यांनी लेखी विरोध नोंदविला यात विषय ४९ गट क्रमांक ४४/२ क्रीडा संकुल समोरील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसवणे विषयात सदर जागा ही महामार्ग अंतर्गत येत असल्याने त्यांची ना हरकत घेणे बाबत मत मांडले.

तसेच विषय क्रमांक ७ मध्ये क्रीडा संकुल च्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी मुदत वाढीच्या विषयवार सदर कामास जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिली असुन फेर प्रस्तावास जोवर मंजुरी मिळत नाही तोवर सदर काम सुरू करू नये,मुदत वाढ देऊ नये असे मत मांडले तर विषय क्रमांक १३ मधील प्रभाग एक मधील स्ट्रीट लाईन ,पोल दुरुस्ती करणे जुनी काढून ती कासोदा रस्त्यावर बसवणे विषयावर  नियमानुसार काम करावे असे मत मांडले तर विषय ४१ मध्ये सिमेंट रस्ता करणे व  दुभाजक कामा बाबत सदर कामास मुदत वाढ देऊ नये,चौकशी पूर्ण झाल्या नंतरच प्रकिया पार पाडावी असे लेखी मत सदर शहर विकास आघाडी च्या नगरसेवकांनी मांडले . यावेळी नगराध्यक्ष करणं पवार यांनी पुन्हा एकदा शहर विकास आघाडी वर शहरातील विकास कामात खोडा करत असल्याचे सांगत एकीकडे शहर विकास आघाडी चे नेते पत्रकार परिषदेत क्रीडा संकुल ला विरोध नसल्याचे सांगुन व्यापारी संकुल विषयावर बोलत होते तर आजच्या सभेत क्रीडा संकुलनाच्या विकास कामांना केलेला विरोध हा पुन्हा शहर विकासात खोडा ठरत नाही का.? असा खडा सवाल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.