प्राचार्यावरील कारवाईने संस्थाचालकांच्या मनमानीला लगाम

0

जळगाव –  कार्यकाळ संपून कार्यरत असलेल्या उमवी कार्यक्षेत्रातील दोन प्राचार्यांची मान्यता काढण्याचा धाडसी निर्णयामुळे कबचौ उमवी प्रशासनाने घेतलेला मनमानी करीत असलेल्या संस्था चालकांना लगाम बसला आहे. संस्थाचालक व संबंधित प्राचार्यांकडून ही दबाव तंत्राचा वापर होऊन विद्यापीठाने कारवाई केल्याने आमच्या तक्रारी व पाठपुरावा यामुळेच झाल्याची माहिती भुसावळ येथील तक्रारदार संस्थापक अध्यक्ष जयश्री न्याती, सामाजिक कार्यकर्ते कुंदन तायडे, प्रा. दिनेश राठी, प्रा. शैलेंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यूजीसीतर्फे सन २०१० साली लागू केलेल्या नियमानुसार ११ प्राचार्यांची विद्यापीठांतर्गत पाच वर्ष कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी २ प्राचार्यांनी मुदत संपल्यानंतर देखील पुर्ननियुक्तीची प्रक्रिया राबविली नसल्यामुळे व संस्था अध्यक्ष व सचिव यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे लक्षात घेत विद्यापीठातर्फे भुसावळ येथील प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा व शहादा येथील प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांची प्राचार्य पदाची मान्यता रद्द करण्यात आल्याने असं धाडसी निर्णय घेणारे कुलगुरू पी.पी.पाटील हे प्रथमच व्यक्ती आहे,ज्याने सर्व हकीकत ऐकून घेत कारवाई केली असल्याने  मनमानी करीत असलेल्या संस्था चालकांना लगाम बसला आहे.

 

यूजीसीतर्फे प्राचार्य भरतीबाबत सन २००० साली नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २०१० साली हा नियम अंमलात आणला. यावेळी विद्यापीठातंर्गत ११ प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्ती ५ वर्षांची होती. या कालावधीत काही सेवानिवृत्त झाले तर काहींचा कामाचा कालावधी संपल्याने आपल्या जुन्या पदावर रवाना झाले. यापैकी काही प्राचार्यांनी नियमावलीचे पालन करत पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर आवश्यक ती पूर्तता केली. मात्र ४ प्राचार्यांनी पुर्ननियुक्ती प्रक्रिया केली नसल्याने त्यांना गेल्या वर्षभरापूर्वी पत्र पाठवण्यात आले होते. यात भुसावळ, शहादा, नंदुबार आणि अक्कलकुवा येथील प्राचार्यांचा समावेश होता. यापैकी अक्कलकुवा व नंदुरबार येथील प्राचार्यांनी राजीनामा दिला तर भुसावळ व शहादा येथील प्राचार्यांनी कोणत्याही नियमांचे पालन केल्याने विद्यापीठातर्फे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली असल्याचे कुलगुरू प्रा.डॉ. पी.पी. पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.