धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूक साठी मतदान ५७.७३% मतदान

0
२९ मतदान केद्रावर झाले  मतदान :
 धरणगाव (प्रतिनिधी) :
येथील पालिकेच्या  नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणूकीसाठी( दि.२९ डिसेंबर रविवार  रोजी ) मतदान शांततेत पार पडले. निवडणुकीसाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
               नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३१ हजार ३०७ मतदारपैकी. १८०८६ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात ९४९१ पुरुष व.८५९५     महिला असे एकूण ५७.७३%  मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला .त्यासाठी  एकूण २९ मतदान केंद्रावर २०० कर्मचारी नियुक्त करण्यात  आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी,सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार हयांनी काम पाहिले.
               दि.२९ रोजी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्याम पोटनिवडणूकीसाठी एकूण सात उमेददवार रिंगणात होते  त्यात  निलेश सुरेश चौधरी  (शिवसेना)  ; मधुकर बन्सी माळी  (भाजपा)  ;  निलेश भागवत चौधरी (राष्ट्रवादी) ;हाजीशेख  ईब्राहीम अब्दुलरसूल अपक्ष) ; उमेश जानकीराम माळी ( अपक्ष) ; संजय एकनाथ माळी (अपक्ष) ; महेंद्र सुभाष पाटील (अपक्ष) यांचा समावेश आहे. यात धर्म-जात की धन फॕक्टर महत्त्वाचा ठरेल व कोण बाजी मारेल ? याकडे शहरवासीयांच्या नजरा लागून आहेत.
                       मतदानाच्या प्रारंभी संथ गतीने मतदान झाले. दुपारून मात्र मतदानाचा वेग वाढलेला दिसला. सकाळी ९.३० पर्यंत ६.८७ टक्के,११.३० पर्यंत १६.५२ टक्के,दुपारी १.३० पर्यंत २८.६४ तर ३.३० वाजे पर्यंत ४२.८० टक्के मतदान झाले होते. अंतिमतः ५७.७३% मतदान झाले.
                      मतदानाची आकडेवारी संथ गतीने वाढत होती. गेल्या निवडणुकीप्रमाणे मतदारांच्या फार मोठ्या रांगा दिवसभर कोणत्याच केंद्रावर दिसून आल्या नाहीत. उमेदवार आणि विविध पक्षांचे पदाधिकारी विविध केंद्रांना भेटी देऊन माहिती घेत होते. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार यांना किती मते पडतात यावर निकालाचा विजय ठरणार आहे. निवडणुकीबद्दल मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.