प्रहार जनशक्ती पक्षाची शेतकरी कांदा समस्येवरील कांदा बैठक जळगांव येथे संपन्न

1

भडगाव | प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाची शेतकरी प्रश्नानावर बैठक उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मा.आमदार बच्चू भाऊ कडु यांनी उत्तर महाराष्ट्रातील कांदा प्रश्नाबाबत मागील दोन महिन्यांपासून आवाज उठवला असून शेतकऱ्यांचा आवाज सरकारी दरबारी पोहचावा यासाठी मा.आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड येथे मुक्काम मोर्चा सभा घेण्यात आली होती.उद्या सटाणा जिल्हा नाशिक येथे कांदा प्रश्नावर सभा आयोजित करण्यात आली आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणा मुळे कांदा प्रति क्विंटल 100 ते 150 रुपये विकला जात असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन व भाव या ज्वलंत प्रश्ननावर 24 फेब्रुवारी 2019 रोजी नाशिक येथे राज्यव्यापी कांदा परिषद घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्ननावर कुंभ मेळावा घेऊन सरकार जागे व्हावे यासाठी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित रहावे यासाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आव्हान केले आहे .
मिटिंग सुरू होण्या अगोदर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली…
यावेळी मिटींग ला जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले पंकज पाटील तालुका अध्यक्ष अमळनेर,प्रशांत पाटिल भड़गाँव प्रकाश राठौड़ भड़गाँव राहुल जाधव (चाळीसगाव), संतोष पाटील (पाचोरा),योगेश चोधरी (एरंडोल), राहुल अग्रवाल (बोदवड), जयंत शूरपाटने (भुसावळ), प्रदीप बोरसे (अमळनेर), युवराज वानखेडे (यावल),विनोद परदेशी (चाळीसगाव), निलेश बोरा (जळगांव), अनिल जोशी (जळगांव), गोपीचंद मराठे (जळगांव), हेमंत साकरे (जामनेर), भगवान परदेशी (चाळीसगाव), शिवाजी पारधी (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जळगांव) प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरच्या कां दा परिषदेस नासिक येथे सर्वानी उपस्तित राहवे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी केले.

1 Comment
  1. Mali k.s .wadekar says

    Jay Javan Jay kisan shetkari sukhi tar Des sukhi bhavano jage vha Chala nashik ok

Leave A Reply

Your email address will not be published.