प्रशासनाच्या निषेधार्थ गाळेधारकांनी केले सामुहिक मुंडन 

0
जळगाव ;-
महापालिकेने गाळेधारकांविरुद्ध अवाजवी भाडे, दंडात्मक रक्कम तसेच ई-लिलावाच्या कार्यवाही विराेधात सुमारे ५ हजारावर गाळेधारकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  मूक मोर्चा काढला होता मात्र अजूनही प्रशासन ‘ढिम्म ‘ असल्याच्या निषेधार्थ आज बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या गाळेधारकांनी स्वयंस्फूर्तीने मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला . दरम्यान २१ मार्च राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे अांदाेलनला सुरुवात झाली असून  २२ मार्च राेजी टाॅवर चाैक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाविशाल मानव साखळी, २३ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर अामरण उपाेषण सुरू केले जाणार
अाहे. असा इशारा देण्यात आला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.