प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ

0

अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात देखील अमळनेर नगरपरिषदेतर्फे विकासाला प्राधान्य देऊन रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हातात घेतली आहेत.

यात नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ आणि १३ मधील डॉ.कुबेर वैद्य यांच्या घरापासून ते  वड चौक  डांबरीकरण कामांचा शुभारंभ माजी आमदार कृषीभूषण साहेबराव दादा व नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक प्रा.रामकृष्ण पाटील व नगरसेविका  चंद्रकला साळुंखे यांच्या उपस्थितीत डॉ.विक्रांत पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी  प्रभागातील डॉ.राजेंद्र सोनार,प्रदीप पाटील,पिंटू भाऊ भामरे, अनिल पाटील,अनिल भाऊ केबलवाले,संकल्प वैद्य, निलेश महिंद ,हर्षल चौधरी योगेश पाटील ,जिगर ठक्कर चेतन पाटील,दीपक सूर्यवंशी विजय जाधव,भटू जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.