प्रत्येकाने आपले ध्येय निश्‍चित करुन ध्येयप्राप्ती होईपर्यंत माघार घेऊ नये

0

जळगाव – स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपतींनी अनेक युद्धनितीचा उपयोग करुन किल्ले काबीज केले. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपले ध्येय निश्‍चित करुन ध्येयप्राप्ती होईपर्यंत माघार घेऊ नये, असे प्रतिपादन शिव्याख्याते प्रा.सचिन देवरे यांनी  केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात बुधवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी  ‘शिवराय डोक्यावर नाही, डोक्यात घ्या’ याविषयावर  प्रा. देवरे बोलत होते.  व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात शासकीय नियमाप्रमाणे राष्ट्रगीताने झाली. तसेच महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्ताने पथनाट्य साजरे करण्यात आली.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्यासह महाविद्यलायातील सर्व उप्राचार्य कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यलायतील सर्व प्राध्यापक तासिका तत्त्वावरील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत.
यावेळी प्रा. देवरे यांनी शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंग सांगून उपस्थितांना मंत्र मुग्ध केले. शिवकालीन गडकोट, दुर्ग, त्यावेळेसची स्थापत्य कला, रायगडाचे वैशिष्ट्ये शिवरायांचे बालपण, आई जिजाऊंची शिकवण, महाराजांच्या यशस्वी मोहिमा, सुरतेची लूट, राज्यभिषेक सोहळा, शिवरायांची चारित्र्य संपन्नता, स्त्री सम्मान या विषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
प्रा.देवरे यांचे महाराजांवर आतापर्यंत १५०० व्याख्यान केली आहेत. स्त्रीयांचा सम्मान कसा करायचा ही शिकवण महाराजांनी जगाला दिली. स्त्री ही मराठ्यांच्या मंदिरातील देवता आहे अशी त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रा. राजेंद्र देशमुख यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.