पोलीस भरती ड्युटीवर असलेल्या पोलिसाचा मृत्यू

0

जळगाव, दि.22 –
जिल्हा पोलिस दलाच्या रिक्त जागांसाठी पोलिस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरु आहे. गुरूवारी मैदानावर ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी 8 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
सिटी पोलीस लाईनमध्ये राहणारे संजय नथ्थू सपकाळे (वय-49) हे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. भरतीप्रक्रिया सुरु असल्याने सपकाळे यांना मैदानाच्या बाहेर देखरेखीची ड्युटी देण्यात आली होती. सकाळी 7 वाजेच्या सुमारास सपकाळे यांना अचानक चक्कर आले. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. यावेळी राखीव पोलिस दलाचे पोलिस निरीक्षक सुभाष कावरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना तात्काळ आर्कीड हॉस्पीटल येथे उपचारार्थ दाखल केले. रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
विविध ठिकाणी बजावली सेवा
सपकाळे यांनी पोलिस मुख्यालय, एमआयडीसी,शनिपेठ, बोदवड, पोलिस मुख्यालय या ठिकाणी सेवा बजाविली असून त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी योगिता, अश्‍विनी, मुलगा भुषण असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.