36 ग्रॅमची मंगलपोत लांबविणारा कामगार जाळ्यात

0

जळगाव, दि.22 –
शहरातील आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरुमच्या तळमजल्यात दागिने दुरुस्ती करणार्‍या कारागीराच्या ताब्यात असलेली 36 ग्रॅम वजानाची सव्वा लाखांची मंगलपोत शोरुममधील नोकरानेच लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी नोकराला ताब्यात घेतले आहे.
बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरुमच्या स्टॉकमधील 36.570 गॅ्रम वजनाच्या मंगलपोतच्या कड्यांना डाग देण्यासाठी तळमजल्यातील दागिने दुरुस्ती करणारा कारागीर देवाशिष मोहनलाल घोष याच्याकडे देण्यात आली होती. शोरुममधील कर्मचार्‍याने कारागिराचे लक्ष नसताना मंगलपोत परस्पर लांबवली होती. याप्रकरणी शोरुममधील कर्मचारी भरत मिश्रीलाल टाटीया यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शनिपेठ पोलिसांनी दिली तपासाला गती
शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, नितीन बाविस्कर, गिरीष पाटील, नरेंद्र ठाकरे, अभिजीत सैंदाने यांनी तपासला सुरुवात केली.
कर्मचार्‍यावर वाढला संशय
मंगलपोत शोरुममधील कर्मचार्‍याने लांबविल्याचे लक्षात येताच पोलिसांचा तिघांवर संशय वाढला. तिघांना ताब्यात घेवून पोलिसांनी वेगवेगळ्या पध्दतीने चौकशी केली. चौकशीदरम्यान यातील रामकृष्ण चौधरी यांच्यावरील संशय वाढल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखविल्यानंतर त्यांने गुन्ह्याची कबुली दिली.
मंगलपोत केली हस्तगत
रामकृष्ण चौधरी यांनी शोरुममधून लांबविलेली 1 लाख 18 हजार रुपये किंमतीची 36 ग्रॅम वजनाची मंगलपोत पोलिसांना काढून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.