पॉर्न साईट्स बंद करा ; नितीश कुमारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

0

नवी दिल्ली : इंटरनेटवरील पॉर्न साईट्स आणि अश्लिल मजकुरावर बंदी घालण्याची मागणी संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्रकाद्वारे केली आहे.  बलात्कारासारख्या घटनांसाठी पॉर्न साईट्सच जबाबदार असतात, असं वक्तव्य यापूर्वी त्यांनी केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. तसंच अशाप्रकारच्या घटनांमुळे जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे. अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. हे दु:खदायक असून हा चिंतेचा विषय आहे. आजकाल मोठ्या प्रमाणात इंटरनेटपर्यंत मुलांची पोहोच वाढली आहे. त्यामुळे मुलं आणि युवक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात अश्लिल मजकुर तसंच हिंसक गोष्टी पाहत आहेत. याच्याच प्रभावामुळे अशा घटना घडत असतात, असं नितीन कुमार यांनी पत्रात नमूद केलं आहे. अनेक घटनांमध्ये त्या घटनेचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरही टाकण्यात येतात. विशेषत: अल्पवयीन किंवा युवकांवर अशा प्रकारच्या मजकुराचा परिणाम होत असतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांसाठी पॉर्न साईटस जबाबदार असल्याचे मत नितीश कुमार यांनी यापूर्वीही व्यक्त केलं होतं. तसंच त्यांनी इंटरनेटवरील अशा सर्व पॉर्न साईटसवर बंदी घालण्याची मागणीदेखील केली होती

Leave A Reply

Your email address will not be published.