मराठमोळे मनोज मुकुंद नरवणे असणार पुढील लष्करप्रमुखपदी

0

नवी दिल्ली : नव्या वर्षात लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यातच उपलष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

लष्करप्रमुख बीपीन रावत हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. नरवणे यांनी लष्कर उपप्रमुख पदाची धुरा सप्टेंबरमध्ये सांभाळली. त्यापुर्वी ते चीन बरोबर चार हजार किमी सीमेवर लक्ष ठेवणाऱ्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. आपल्या 37 वर्षांच्या सेवेत नरवणे यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले. शांती मोहिमांतही त्यांचा समवेश होता. जम्मू काश्‍मिर आणि ईशान्य भारतात त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची कामगिरी बजावली. जम्मू काश्‍मिरमध्ये ते राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख होते. श्रीलंकेतील शांती सेनेत त्यांचा सहभाग होता. म्यानमारमधील भारतीय दुतावासाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे अनेक वर्ष होती.

त्यांनी शीख इनफ्रंट्री रेजिमेंटमधून जुन 1980मध्ये सेवेस सुरवात केली. जम्मू काश्‍मिरातील उल्लेखनीय कामगिरीबाबात त्यांना सेना मेडल प्रदान करून गौरवण्यात आले आहे. नागालॅंडमध्य कार्यरत असताना त्यांना अतिविशिष्ठ सेवा पदकाने गौरवण्यात आल होते.

Leave A Reply

Your email address will not be published.