पैसे परत मिळत नसल्याने ‘डीएसके’च्या ठेवीदाराची आत्महत्या

0

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनी गुंतविलेले पैसे मिळत नसल्याने पुण्यात एक ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक म्हणून ‘डीएसके’कडे  पैसे मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी डीएस कुलकर्णी यांना जबाबदार ठरवलं आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने चौथ्या मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेतून आत्महत्या करत असल्याच पत्र लिहून ठेवले आहे.

पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहणाऱ्या तानाजी गणपत कोरके (वय ६०) यांनी गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने आपले आयुष्य संपवले. मूळचे शिवसैनिक असलेले कोरके यांच्या पश्चात चार मुली आहेत. दोन मुलींचा विवाह झाला होता.

२०१४ मध्ये दोन मुलींच्या लग्नासाठी स्वतःच्या नावे चार लाख तर नातवंडांच्या शिक्षणासाठी जावयाच्या नावे पन्नास हजार रुपये रक्कम डीएसके डेव्हलपर्स यांच्याकडे गुंतवणूक केली होती. २०१७ मध्ये त्याची मुदत संपल्यावर रकमेसाठी अनेकदा पाठपुरावा केला. तिसऱ्या मुलीचे लग्न पाहुण्यांकडून उसने पैसे घेऊन केले मात्र चौथ्या मुलीचे लग्नासाठी पैसे कोठून आणायचे या चिंतेपायी आयुष्य संपवत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.