पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आमदाराला डावलले

0

जळगाव  जिल्ह्यातील  चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवार दिनांक १६जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला चोपडा विधानसभा मतदार  संघाचे आमदार सौ लता सोनवणे यांची  उपस्थिती खटकली.काही वैयक्तिक कारणास्तव आमदारांची अनुपस्थिती असती  तर ते त्यांचे कोणाला काही वाटले नसते. चक्क संपूर्ण कार्यक्रमातून आमदार सौ सोनवणे याना डावलण्यात आले हे विशेष पालकमंत्री गुलाबराव हे शिवसेनेचे मंत्री कार्यक्रमास महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाच्या नेत्याचा समावेश होता. इतकेच नव्हे तर या विभागाचे भाजपचे खासदार रक्षा खडसे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ जावळे याच्याही प्रमुख पाहुण्यांमध्ये पत्रिकेत समावेश होता.
त्याचबरोबर शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार कैलास पाटील यांचाही निमंत्रण पत्रिकेत समावेश होता. प्रोटोकॉल नुसार सहकार खात्याच्या वतीने चोपड्याचे स्थानिक आमदार म्हणून सौ लता सोनवणे निमंत्रण देऊन त्यांच्या नावाचा निमंत्रण पत्रिकेत समावेश करने गरजेचे होते. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक तालुका उपनिबंधक आणि कृउबाचे सचिव यांनी स्थानिक आमदाराच्या नावाचा निमंत्रण पत्रिकेत प्रमुख अतिथीमध्ये नामोल्लेख करणे आवश्यक होते. सहकार खात्याचे अधिकारी म्हणून त्यांनी एक तर आपली जबाबदारी झटकली आहे किंवा स्थानिक राजकारणाचे ते बळी ठरले आहेत.असेच म्हणावे लागेल. जिल्हयाचे पालकमंत्री चोपड्यात  येतात अन त्यांच्या कार्यक्रमाला आमदार उपस्थित राहत नाहित याचे अनेक अर्थ निघतात.
एक तर महाविकास आघाडीत सध्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये खदखद सुरु आहे. त्याचाच  एक भाग म्हणून शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांनी अनुपस्थित राहून आपली नाराजी तर व्यक्त केली नाही ना ?त्याचबरोबर चोपडा येथील शिवसेनेची गटबाजी जगजाहीर आहे. माजी आमदार चोपडा सूतगिरणीचे चेअरमन कैलास आणि माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांचेतील विळ्याभोपळ्याचे नाते  सर्वश्रुत आहे. प्रा चंद्रकांत सोनवणे यांचे कट्टर विरोधक असलेल्या कैलास पाटलांना चोपडा कृउबा च्या कार्यक्रमास स्थान देऊन त्यांचे हस्ते लिलाव शेडचे उद्घाटन करण्यास आले. चोपडा कृउबा चेअरमन व्हा चेअरमन आणि संचालक मंडळाने आमदारांना डावलून त्यांचे जखमेवर मीठ चोळले आहे असे म्हणावे लागेल.
त्यामुळे चोपडा तालुक्यातील शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळून येतेय असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. चोपडा तालुक्यातील शिवसेनेची गटबाजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर उघड झाली. हे विशेष म्हणता येईल. विशेष म्हणजे चोपडा तालुक्यात माजी आमदार चद्रकांत सोनवणे आणि राष्ट्रवादीचे नेते अरुण भाई गुजराथी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांचे कट्टर  विरोधक समजले जातात. विधानसभा निवडणुकीत सौ लता सोनवणे यांचे विरोधात राष्ट्रवादी व कॉग्रेसतर्फे जोरदार प्रचार मोहीम राबविली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार जगदीश वळवी यांचे पारडे जड असल्याचे वातावरण निर्माण असल्याचे चित्र दिसून येत होते.परंतु निकालात ते चित्र उलटे झाले. सौ लता सोनवणे विजयी झाल्या प्रा चंद्रकांत सोनवणेची सरशी झाली. त्याचाही परिणाम चोपडा कृउबाच्या कार्यक्रमात झालेला दिसून येतो.
चोपडा कृउबाच्या विविध विकास कामाच्या समारोपाला स्थानिक म्हणून सौ लता सोनवणेची अनुपस्थित ते मात्र खळबळ उडणे साहजिक आहे. यामध्ये तालुक्याचे राजकारण स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व कॉग्रेस हे पक्ष शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्थात अशा विरोधात शिवसेनेचे माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांचेवर काही परिणाम होणार नाही. कारण गेल्या पाच वर्षातील आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात प्रा सोनवणे यांनी कुणालाही भीक घातली नाही. स्वतःला कट्टर शिवसैनिक म्हणविणारे चोपड्याचे स्थानिक असलेले माजी आमदार कैलास पाटील यांचीच शिवसेनेतून हकालपट्टी झाली. आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे चोपड्यात पहिल्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यक्रमाला हजर असताना त्यांच्या कार्यक्रमाला स्थानिक  आमदार म्हणून  सौ लता सोनवणे यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे दृष्टीनेसुध्दा हा  प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणता येईल हि बाब मात्र शिवसैनिकात गैरमज पसरविणारी म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे प्रोटोकॉलनुसार आमदारांना निमंत्रण न देणाऱ्या अधिकाऱ्याची बेजबाबदारपणा होय.
स्थानिक आमदारांना निमंत्रण दिले नसल्याने हक्कभंग केलाय. सहकार खात्याचे अधिकाऱ्याकडून त्यांचेवर कारवाई होऊ शकते. आमदार सौ लता सोनवणे यांनी अधिकाऱ्याच्या या वागनुकीसंदर्भात काय भूमिका घेतात हे लवकरच कळून येईल. एकंदरीत चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामाच्या या सोहळ्याला अनेक प्रश्न उपस्थित होतात. चोपड्याचे आमदार महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त केलीय. चोपडा तालुक्यातील शिवसेनेतील गटबाजीचे दर्शन होय.  अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचा केला भंग चोपडा कृउबाचा कार्यक्रम ठरला वादग्रस्त.       

Leave A Reply

Your email address will not be published.