पेट्रोल-डीझेल दर वाढीचा सपाटा सुरूच ; घ्या जाणून आजचे दर

0

मुंबई : पेट्रोल-डीझेल दर वाढीचा सपाटा सुरूच आहे. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल २९ पैसे तर डिझेल ३५ पैशांनी महागले आहे.

 

पेट्रोलियम कंपन्यांनी नव्या वर्षात आतापर्यंत १६ वेळा इंधन दरवाढ केली आहे. या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेल सरासरी ४ रुपयांनी महागले आहे. इंधन दरवाढीवर ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा आढावा घेतला जातो.

 

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९४.६४ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.३२ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.१४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७८.३८ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९०.४४ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८३.५२ रुपये भाव आहे.

 

कोलकात्यात आज पेट्रोल ८९.४४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८१.९६ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९१.०९ रुपये असून डिझेल ८३.०९ रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीवर विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका करण्यात येत

Leave A Reply

Your email address will not be published.