पेट्रोल- डिझेलने उच्चांक गाठला दर वाढल्याने महागाई देखील वाढणार

0

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सुरु असलेली इंधन दरवाढ कायम आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे ८४. ७३ रुपयांचा आकडा गाठला. तर डिझलेने लिटरमागे ७२. ५३ रुपयांचा आकडा गाठला आहे.

पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने महागाई देखील वाढणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरुन विरोधकही आक्रमक झाले असून सोशल मीडियावरही मोदी सरकारवर टीका सुरु आहे.कर्नाटकच्या निवडणुकीमुळे केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने काही काळ रोखून धरलेली इंधन दरवाढ निकालानंतर लागू केल्यामुळे देशभरात पेट्रोल- डिझेलच्या दराने उच्चांक गाठला.

Leave A Reply

Your email address will not be published.