पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला सलग सातव्या दिवशी ‘हा’ निर्णय ; जाणून घ्या काय आहे?

0

मुंबई : गेल्या आठवड्यातील दरवाढीने पेट्रोलने ९० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या दरवाढीने सरकारविरोधात देशभरात आंदोलन झाले. मात्र त्यानंतर कंपन्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. सलग सातव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

 

आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.

 

तेलाचा वाढता भाव आणि रुपयाचे डॉलरसमोरील अवमूल्यन कंपन्यांसाठी तेल आयात खर्चिक ठरत आहे. त्यामुळे आठवडाभरापूर्वी कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला होता. मागील सोमवारपूर्वी सलग सहा दिवस झालेल्या दरवाढीने पेट्रोल १.३७ रुपयांनी आणि डिझेल १.४५ रुपयांनी महागले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.