पुण्यात सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन ; वाचा संपूर्ण नियमावली

0

पुणे : वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

पुण्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक झालेला आहे. दररोज जवळपास चार ते साडे चार हजार रुग्णसंख्या मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णालयांतील बेड्सची समस्या देखील उद्भवू लागली आहे. आज उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव   यांनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील मिनी लॉकडाऊनची नियमावली सांगितली.

पुण्यातलं मिनी लॉकडाऊन कसं असेल?

लॉकडाऊन कुणालाच नको आहे मात्र वाढणारी रुग्णसंख्या पाहता कडक निर्बंध तर लादावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील काही दिवसांसाठी काही नियम आखले आखले आहेत. नव्या नियमांनुसार सार्वजनिक बससेवा, धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

दिवसभर जमावबंदी, संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. दिवसभर जमावबंदी असणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळं बंद…

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद राहतील. तसंच धार्मिक स्थळं देखील पुढील 7 दिवसांसाठी बंद असतील.

पुण्यातील PMPML बससेवा बंद

पुण्यातील PMPML बससेवा पुढील 7 दिवस बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तसंच आठवडे बाजारही बंद राहणार आहे.

लग्न, आणि अंत्यसंस्कारांना परवानगी, बाकी कार्यक्रमांना नाही…

लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत, हा देखईल मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिम सुरु राहणार

पुण्यातील जीम सुरु राहणार आहे. जीम बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.