पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन-2021-22 खरीप हंगामाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत काढणी पश्चात नुकसान या बाबीकरीता ज्या पिकांची कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी  शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निकषांच्या अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या अधिसूचित  पिकांचे काढणीनंतर नुकसान झाले असल्यास 72 तासांच्या आत झालेल्या नुकसानीची सूचना प्रथम विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, ईमेलव्दारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईनव्दारे देणे आवश्यक आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.