पीक कर्ज वाटपाबाबत बँकांकडून अडवणूक : पारोळा तालुका काँग्रेसतर्फे निषेध

0

पारोळा- पीक कर्ज वाटपा बाबत बँकांकडुन अडवणूक होत असून शासन उदासीनपणा दाखवीत आहे. याबाबत  10 रोजी दुपारी 1 वाजता तहसीलदार यांच्या कार्यालया समोर शासनाचा जाहीर निषेध करण्यात येऊन पारोळा तालुका काँग्रेसतर्फे नायब तहसीलदार पाडवी यांना निवेदन  देण्यात आले.

यात  मालाड मुंबई येथे भ्रष्टाचारामुळे भिंत कोसळून 27 जण बळी गेलेत तसेच तीवरे जिल्हा रत्नागिरी येथे धरण फुटल्याने 19 जणांचा मृत्यू झाला असून  चार जण बेपत्ता आहेत या घटनांमधील दोषींवर कारवाई करण्याबाबत राज्य सरकारने अक्षम निष्क्रियता दाखवित आहेत तसेच  पीक कर्ज वाटपा बाबत बँकांकडुन अडवणूक केली जात आहे यात राज्य सरकारची उदासीनता दिसून येत आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात  पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये 50 पैशांनी भरमसाठ वाढ केली आहे यामुळे सामान्य नागरिकांवर बोझा पडणार आहे.या निर्णया विरोधात काँग्रेसच्यावतीने  निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान , उपाध्यक्ष प्रा.संजय पाटील , आनंद अहिरे , अविनाश  मराठे , अनिल गंगाराम पाटील , भरत निकम , व  तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित  होते.

Leave A Reply

Your email address will not be published.