कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

0

बंगळुरु : कर्नाटकातील काँग्रेस-‘जेडीएस’ आघाडी सरकारमधील बंडखोर १६ आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहे. दरम्यान, राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची भूमिका कर्नाटक पोलिसांनी  घेतली आहे.

पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.