पाळधी येथे पोलिस निरीक्षकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की

0

पाळधी : गावातील ग्रामपंचायतीजवळ सॅनिटायझर पॉइंटवर नियुक्त कामगाराला दुचाकीची धडक दिली. याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाला दुचाकीस्वारासह त्याच्या भावाने अरेरावी तसे शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व गणवेश फाडल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता पाळधीत घडली. या प्रकरणी दोघा भावांविरुद्ध शासकीय कामात अडथळासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावांमध्ये सॅनिटायझर वाईल्ड करण्यात आलेला आहे या ठिकाणी भाईदास माळी या कामगारांची नियुक्ती आहे . शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास माळी या ठिकाणी कामावर असताना गावातीलच राहुल गुलाब फुलझाडे हा तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव आला. या दरम्याने मारियांना दुचाकीची धडक दिली यात माळी जमिनीवर कोसळले. त्यानंतर दुचाकी सॅनिटायझर पॉइंटच्या शिडीवर धडकली. संबंधित प्रकाराबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एल गायकवाड यांना माहिती मिळाली. संबंधित प्रकाराबाबत गायकवाड यांनी अपघातात जबाबदार राहुल फुलझाडे यास जाब विचारला असता त्याने गायकवाड यांना अरेरावी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली . यानंतर घटनास्थळी राहुलचा भाऊ सचिन गुलाब फुलझाडे हाही धावुन आला. गायकवाड यांच्या अंगावर धावून जात त्याने शर्टाची कॉलर पकडली यानंतर धक्काबुक्की करत गणवेशावरच नंबर प्लेट तोडुन गणवेश फाडला .

तरुणाने लोखंडी गेटवर डोके आपटुन स्वत:ला जखमी करुन घेतले

या प्रकारानंतर राहुल फुलझाडे याने पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या जिन्याच्या लोखंडी गेटला डोके तसेच हात आपटुन स्वतःला जखमी करून घेतले . यानंतर पोलिसांना बघून घेऊ अशी धमकी देत दोघेही घटनास्थळावरून पसार झाले . याप्रकरणी राहुल गुलाब फुलझाडे व सचिन गुलाब फुलझाडे या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.