भुसावळ एमआयडीसी परिसरात भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

0

भुसावळ (प्रतिनिधी) -:भुसावळ शहरातील खडका, किन्ही शिवारातील एमआयडीसीतील ए – 12 प्लॉटमधील डिस्को इंटरप्राईजेस या इलेक्ट्रीकल वस्तू निर्मितीच्या कंपनीला रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली.
आगीवर नियंत्रण आल्याने संपूर्ण कंपनीसह दोन आयशर जळून खाक झाल्या. या आगीत कोटयावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लोकडाउन सुरुं असून उद्योगधंदे बंद आहेत .अश्यातच आज रविवार रोजी दुपारी ११.३० वाजेचे सुमारास भुसावळ येथील एमआईडीसी परिसरात अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली .
खडका किन्ही मार्गावर असलेली एमआयडीसी येथील डिस्को इंटरप्राईजेस या इलेक्ट्रीकल वस्तू निर्मितीच्या कंपनीला ही आग लागल्याचे समजते . आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे
घटनेचे वृत्त कळताच तालुका पोलिसांसह बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरुं केले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याकरीता भुसावळ पालिका व दीपनगर येथून अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले . सोसाटयाच्या वारा व गवतामुळे आगीने चांगलाच रौद्रावतार धरला . जोराची हवा व गवतामुळे आग भडकतच होती.
यामुळे अवघ्या दीड तासात एमआयडीसीत डिस्को इंटरप्राईजेस मधील टिव्ही, फायबर, कुलर आदी वस्तूंची निर्मिती करणारी संपूर्ण कंपनी जळून बेचिराख झाली. दरम्यान या कंपनीच्या कंपाऊंडमध्ये दोन आयशर वाहने उभी होती, ती देखील आगीत भस्मसात झाली.
दरम्यान ही भिषण आग आटोक्यात आणण्याकरीता
भुसावळ नगरपालिकेचे दोन व दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे एक अशा तीन बंबांनी तब्बल १० ते १२ फेऱ्या करुनही आग नियंत्रणत आली नव्हती मात्र अग्नि शमन दलाचे
शर्थीचे प्रयत्न सुरु होते .

Leave A Reply

Your email address will not be published.