पारोळ्यातील विहिरीची नगरपालिकेकडून साफसफाई

0

पारोळा- तामसवाडी धरणातील जलसाठा अत्यल्प असल्या मुळे पारोळा शहराला बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील विहिरीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान बारा दिवसा नंतर नळाना पाणी येत असल्याने अनेक नागरीक विशेषता महिला विहिरी वरील पाणी वापरण्या बरोबरच पिण्यासाठी  सुध्दा वापरतात मात्र हे पाणी पिण्यासाठी योग्य नसून  त्या विहिरी मध्ये नगरपालिका प्रशासनाने पावडर टाकून स्वच्छ करावे अशी मागणी होत होती .. त्यांची दखल पारोळा न, पा,चे मुख्याधिकारी डॉ सचिन माने व नगराध्यक्ष करण पवार यांनी या कडे गांभीर्याने लक्ष दिले व ताबडतोब तलाव गल्लीतील  विहिरीवर मुकरदम _ संदिप पाटील , किरण जावळे , निर्भय  मोरे व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांना  पाठवून तेथील विहिरीतील घाण काढून , पाण्यात पावडर टाकून  पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला .

दरम्यान शहरातील विहिरीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये असे आव्हानही न . पा . तर्फे करण्यात आले आहे . तलाव गल्लीतील विहिरीची ताबडतोब दखलघेवून साफसफाई करून पाण्यात पावडर टाकल्या बदल नगरपालिका प्रशासनाचे विशेष आभार रहिवाश्यांनी मानले आहे.

कुठल्या विहिरीवर असते गर्दी

पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी नागरीक विशेषता माहिला या विहिरीवर गर्दी करतात त्यात  तलाव गल्ली , मोठा महादेव चौक, मज्जीद जवळ, पीर दरवाजा,  गोधळवाड, हिराबाबाचा मळा, बागेचा मळा, शेवडे गल्लीतील विहिर, शनि मंदिर, बुधनाथ महाराज मठ, आदि भागातील विहिरीचा समावेश आहे.

 पारोळा शहराला दहा ते बारा दिवसाआड पाणी

तामसवाडी धरणात पाण्याची पातळी ने तळ गाठला असुन  पारोळा शहराला पाणी पुरवठा दहा ते बारा दिवसा आड होत आहे . शहराला दहा ते बारा दिवसा आड पाणी पुरवठा होत असल्याने इतक्या दिवसाचा पाणी साठा कसा भरुन ठेवणार  आणि भरून ठेवले तरी त्यात जंतू पडण्याची भीती वाटते, पाणी भरण्या इतकी व्यवस्था प्रत्येका जवळ असेलच असे नाही त्या मुळे अनेकाना पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे .सकाळ संध्याकाळ महिला डोक्यावर हंडे घेऊन विहिरीवर पाणी भरण्या साठी महिलांची गर्दी दिसत आहे. मे महिन्यात उन्हाची लाही लाही होत असताना पाण्या साठी नागरीक वणवण भटकत आहे शहरातील अनेक हातपंप ना .दुरुस्त आहेत . नगरपालिकाने या कडे हि लक्ष देवून . ना दुरुस्त हात पंप हि लवकर सुरु करावेत अशी मागणी हि शहर वासिंनयान कडुन होत आहे, तरी न, पा प्रशासन लवकरच या कडे लक्ष देईल, अशी आशा आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.