पारोळ्यातील तरूणाचा अपघाती निधनाने शहर हळहळले

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथील अमळनेर रस्त्यावर अज्ञात ट्रॅक्टरने मोटर सायकल ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा  जागीच मृत्यु झाला तर एक जण जखमी झाल्याचे घटनेने संपुर्ण पारोळा  शहर हळहळले हि घटना दिनाक १५ रोजी रविवार च्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास  घडली.

स्वामी माधवराव (बाळासाहेब) पाटील ( २२ ) व त्याचा मित्र हे अमळनेर रस्त्याने मोटरसायकल क्रमांक एम एच १९ . ७२५६ ने घराकडे येत असतांना समोरून भरधाव  येणाऱ्या  अज्ञात ट्रॅक्टरने मोटर सायकला  धडक दिल्याने स्वामी माधवराव पाटील ( २२ )  यास डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला तर त्याच्या मित्रास पायला जबरदस्त मार लागला . स्वामीप्रसाद हा सिव्हील इंजिनियर होता . त्याच्या पश्चात आई , वडिल , बहिण , ४ भाऊ , असा परिवार असुन तो पारोळा येथिल दै,देशदुत चे जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांचा लहान मुलगा तर पत्रकार योगेश आणि नितिन पाटील यांचा लहान भाऊ होत . स्वामीच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे . या बाबत पारोळा पोलीसात अज्ञात ट्रॅक्टर चालका विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.