पारोळा येथे ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; शिवसेना युवासेनेचा उपक्रम

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचें आयोजन करण्यात आले होते यात ७१ रक्तदात्यानी रक्तदान केले.

 

याबाबत अधिक असे कि, माझे कुटुबं माझी जबाबदारी!अभियानामुळे जरी कोरोना आटोक्यात येत आहे तरी संपुर्ण राज्यभरात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभुमिवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, यांच्या प्ररेणेतुन   व पर्यावरण मंत्री अद्दित्य ठाकरे,यांच्या आदेशावरून संपुर्ण राज्यभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

 

या आव्हानाचे पालन करून युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य कुणाल दराडे, किशोर भोसले, एरंडोल विधानसभा क्षेत्राचे आ, चिमणराव पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभपती व जळगाव जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल पाटील,यांच्या आदेशाने रविवारी एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्रात शिवसेना व  युवासेना यांच्या वतीने धुळे येथिल जिवन ज्योती ब्लड बॅंक यांच्या सौजन्याने, पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

सर्व रक्तदात्यांचे आ,चिमणराव पाटील, कृषि उत्पन्न चे सभापती अमोल पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील,यांनी प्रमाण पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले,याप्रसंगी तालुकाप्रमुख आर,बी,पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे,  युवासेना तालुकाप्रमुख बबलु पाटील,पारोळा शहर युवासेना प्रमुख आबा महाजन,कृषिउत्पन्न बाजार समिती उपसभापती दगडु पाटील,संचालक चतुर पाटील,मधुकर पाटील,नगरसेवक मंगेश तांबे,राजेंद्र कासार,यांच्या सह शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.