पारोळा येथे १०० बेडच्या कोवीड केअर सेंटरचे लोकार्पण ; अमोल पाटलांच्या प्रयत्नाना यश

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथिल कृषि उत्तपन्न बाजार समितीत आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या दुरदृष्टीने व अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, पारोळा ता.पारोळा जि.जळगांव येथे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन….Covide – 19 या संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संक्रमित रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आपल्या परिसरात ही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे .अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे माझ्या मतदार संघातील व परिसरातील मायबाप जनतेवर ही वेळ येऊ नये त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी स्वतः कोरोना संक्रमित असतांना देखिल मतदारसंघातील माय-बाप जनतेसाठी अवघ्या ५ ते ६ दिवसांत २५ आॕक्सिजन व ७५ नाॕन आॕक्सिजन बेड असे एकुण १०० बेडचे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरची उभारणी केली. यात मा.अमोलदादा चिमणरावजी पाटील यांनी माय-बाप जनतेची कुठेही गैरसोय होऊ, बेड अभावी वणवण होऊ नये, रूग्णांना वेळवर उपचार मिळावे यासाठी अहोरात्र झटत अवघ्या ५ ते ६ दिवसांत सुसज्ज असे १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले.

आज आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या दुरदृष्टीने व मा.अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, पारोळा ता.पारोळा जि.जळगांव येथे हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मा. नागोरावजी चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अमोल चिमणरावजी पाटील सोबत उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दातीर मॅडम, गटविकास अधिकारी एन आर पाटील, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत, तालुका निबंधक कार्यालयाच्या श्रीमती सिंहले मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रांजली पाटील, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आर बी पाटील सर, शहर प्रमुख अशोक भाऊ मराठे, बाजार समितीचे संचालक चतुर भाऊसाहेब पाटील, उपसभापती दगडू बापू पाटील, संचालक मधुकर पाटील, प्रेमानंद भैय्या पाटील, पि.के. पाटील,जिजाबराव पाटील,बी.एन. पाटील सर दीपक पिंगळे बाजार समीतीचे सचिव श्री. रमेश चौधरी व मान्यवर उपस्थित होते

येत्या महिन्याभरात पारोळा येथे आॅक्सिजन प्लांट

पारोळा येथे महिन्याभरात आॅक्सिजन प्लांट ची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक  डाॅ, चव्हाण यांनी पारोळा येथे कोविड सेंटर च्या लोकार्पण वेळी माध्यम प्रतिनिधी  सोबत बोलत असताना सांगितले तसेच लवकरच पारोळा येथे लसिकरण पुर्ववत होईल तसेच यापुढे लसिकरण हे शहरातील एन,ई,एस,गर्ल हायस्कुल येथे सुरु करणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली,तसेच कोणीही रेमडिसिवरचा आग्रह करू नये डाॅक्टराच्या सल्या नुसारच रेमडेसिवरचा वापर करावा,तसेच कोणत्याही खाजगी कोविड सेंटर ने अव्वाच्या सव्वा बिले आकारल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन ही डाॅ,चव्हाण यांनी केले,याप्रसंगी सर्व मान्यवराचा सत्कार पारोळा कृषि उत्तपन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आला तर सुत्रसंचालन व आभार प्रा, आर,बी पाटील यांनी मानले

Leave A Reply

Your email address will not be published.