पारोळा येथे विना पास फिरणाऱ्यावर होणार कारवाई : मुख्याधिकारी

0

पारोळा (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आला आहे. तरीही काही ठिकाणी अनेक जणांना जिवनाअवश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडावेच लागत असल्याने अनेकांना त्याचा त्रास ही होत आहे व काही ना तर पोलीस प्रशासनच्या लाठी मार ही बसत आहे.  या सर्व बाबी लक्षात घेऊन पारोळा नगरपालिकेच्या वतीने एक पास बनवण्यात आले आहे. ही पास शहरातील प्रत्येक घरात नगरपालिकेचे कर्मचारी वितरीत करणार असल्याचे पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ विजय कुमार मुंडे यांनी ‘दैनिक लोकशाही’चे प्रतिनिधी अशोक कुमार लालवानी यांना सांगितले.

तसेच या पास ने शक्यतो तिन दिवसाआड नागरिकांनी घराबाहेर पडून वापर करायचा आहे, या पास वर जिवनाअवश्यक वस्तूची खरेदी केल्याचे नमूद करणे आवश्यक आहे यात किराणा, दुध, मेडिकल,दवाखान्यात जाणे असे, या पास वर दि,२७/३/२०२० ते  १४/४/२०२० पर्यंत ची तारीख छापुन ही पास शहरातील प्रत्येक घरा घरात वितरित करण्यात येत आहे, तसेच ग्रामीण भागातील अनेक जण पारोळा येथे काही जिवनाअवश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी येत असतात असे विचारले असता मुंडे साहेबांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली कि आपन ग्रामीण भागातील पोलीस पाटील  यांना सांगीतले आहे जे कोणी ग्रामीण भागातून शहराकडे जिवनाअवश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी येतील त्यांना ही आपण ओळखपत्र बनवून द्यावे, जेणेकरून त्यांना शहरात कोणतीही अडचण येणार नाही.  प्रशासनास सहकार्य करा,आपल्या कुटुंबाचे रक्षण करा, असे आवाहन पारोळा पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, तसेच पारोळा नगरपालिके चे मुख्याधिकारी डॉ विजय कुमार मुंडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.