धक्कादायक : मृत्यूपूर्वी ‘त्या’ व्यक्तीने १०० जणांची घेतली होती भेट ; २३ जणांना कोरोनाची लागण

0

अमृतसर : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढतच चालला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीने रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांनी १०० जणांची भेट घेतली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्यक्तीमुळे राज्यातील २३ जणांना लागण झाली आहे. १८ मार्च रोजी या व्यक्तीचं निधन झालं.

गुरुद्वारात धर्मगरु असणाऱी संबंधित ७० वर्षीय व्यक्ती दोन आठवड्यांसाठी परदेशात वास्तव्यास होती. जर्मनी आणि इटली येथे आपल्या शेजारच्या गावातील दोन मित्रांसोबत ते गेले होते. मात्र परतल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं नव्हतं. अनेकांची ते भेट घेत होते. ६ मार्च रोजी ते दिल्लीत पोहोचले आणि तेथून पंजाबमध्ये आपल्या गावी परतण्यासाठी वाहनाने प्रवास केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ८ ते १० मार्च दरम्यान आनंदपूर साहिब येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. धक्कादायक म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांनी १०० जणांची भेट घेतली होती. त्यांनी आणि त्यांच्या दोन्ही मित्रांनी राज्यातील १५ गावांचा दौरा केला होता. ही सर्व गावे सील करण्यात आली आहे. त्यांच्या कुंटुंबातील १४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांचा नातू आणि नातीने तर हजारो जणांची भेट घेतली आहे.दरम्यान, अधिकारी सध्या त्यांनी कुठे प्रवास केला होता याची माहिती घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.