पारोळा येथे लसीकरण ठिकाणी न.पा. कर्मचाऱ्यांकडून योग्य नियोजन

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे मागील तीन दिवसा पासुन लसिकरणाचे काम चालु आहे,परंतु इथे अनेक समस्या ना तोंड देत  न,पा,कर्मचारी पारोळा मुख्यधिकारी ज्योती भगत यांच्या आदेशानुसार  जिवाचे रान करुन लसिकरणाचे नियोजन करित आहेत,रोजच नव नविन समस्या या ठिकाणी येत असल्याने कर्मचारी ही वैतागले आहेत.

पहिल्या दिवसापासुन न,पा चे च्या वतिने येथे नियोजन करण्याचे काम सुरू आहे,पहिल्या दिवशी अनेक नागरिकांनी गर्दी केल्याने नियोजन कोडमंडले होते तर दुसर्या दिवशी फक्त नोंदणी कृत नागरिकांना ते ही फक्त १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस चे नियोजन असतांना अनेक जेष्ठ नागरिक व नोंदणी न झालेल्यानी गर्दी केली तर केंद्रा वर बाहेरील तालुक्याच्या लोकाची नोंदणी जास्त असल्याने ही गोंधळ उडाला त्या मुळेही कर्मचार्याना स्थानिक नागरिकाच्या रोषला सामोरे जावे लागले.

तर आज तिसर्या दिवशी ४५ वर्षा वरिल नागरिकांसाठी लस असल्याने जेष्ठ नागरिकांनी सकाळ पासुन रांगा लावल्या लसिकरणाचे काम संथ गती ने होत असल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास जाणवत असल्याने  तिथे न,पा,च्या वतीने ग्रिन मॅट बांधुन सावली करण्यात आली ,तर काही सामाजिक संस्थाही या ठिकाणी मद्दीती साठी पुढे आल्या असल्याचे दिसले, यात नेहमीच सत्कार्यात पुढे असलेले  शिरोळे बंधु यांच्या कडुन लसिकरणा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात तर नगर पालिके च्या वतीने नियोजन बद्द पद्दतीने लसिकरणा च्या लाईनी साठी  बॅरिकॅटस्ट लावण्यात आले,पालिकेच्या वतीने अॅन्टीजन टेस्ट करूनच लस दिली जात आहे.

तसेच न,पा,लसिकरणा ठिकाणी सर्वतोपरी मद्दत करेल असे पारोळा मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी सांगीतले,या ठिकाणी नियोजन करण्यासाठी न्,पा,चे कर निरिक्षक संदिप सांळुखे यांच्या देखरेखी खाली किरण कंडारे,कृणाल सौपुरे,आकाश कंडारे तर न,पा,च्या वतीनअॅन्टीजन टेस्ट साठी अक्षय चव्हाण,यांनी योग्य नियोजन करित या ठिकाणी परिश्रम घेत असल्याची माहिती पारोळा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी दिली,

Leave A Reply

Your email address will not be published.